
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल ( kailash gorantyal) आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) सोसायटी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सोसायटीच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेचेच्या (Shivsena) तेराच्या तेरा उमेदवारांनी विजयाचा धुरळा उडवला. शिवसेनेचा पॅनल विजय झाल्याने आमदार कैलास गोरंट्याल यांचा दोन मतदार संघात दारुण पराभव झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Krushi Uttpan Bazaar Samiti) आपलं वर्चस्व कायम राहावं, यासाठी खोतकर आणि गोरंट्याल यांच्यासाठी ही सोसायटी निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून खोतकर आणि गोरट्याल आमने-सामने आल्याने मोठा राडा या ठिकाणी निर्माण झाला होता.खोतकर समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप गोरंट्याल समर्थकांनी केल्यामुळे पोलिसांचा मोठा फ़ौजफाटा तैनात करण्यात आला होता.
दिवसभर बाचाबाची आणि गोंधळात झालेल्या या निवडणुकीत अखेर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या पॅनल चे १३ च्या १३ उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना दोन मतदार संघातून पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेना पॅनलचा दणदणीत विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
यावेळी अर्जुन खोतकर यांनी गोरट्याल यांनी आपल्याला ग्रामपंचायत क्षेत्रात निवडून येण्याचे आव्हान केले होते. त्यामुळे दिलेलं आव्हान पूर्ण केलं आहे.निवडणूकीत काँग्रेस आणि भाजपच्या पॅनलचा शिवसेनेने पराभव केला आहे, असं सांगत अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.