Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पावसात भिजत शेतीच्या बांधावर पोहोचले, शेतकऱ्यांची समस्या ऐकून गहिवरले

Ahmednagar Farmers : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV

Ahmednagar News :

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. कोपरगाव, संगमनेर, राहता तालुक्यातील शेतकऱ्यांशी त्यांना संवाद साधला. शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असलेले बबन घोलप आणि भाऊसाहेब वाकचौरे हे देखील उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या समस्या यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. भर पावसात उद्धव ठाकरे शेताच्या बांधावर होते. उद्धव ठाकरेंनी पावसात भिजत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपलं सरकार नसलं, तरी तुम्ही माझ्यासोबत आहात. आपलं सरकार असताना शेतकऱ्यांना मदत दिली, मात्र मागच्या वर्षी गद्दारांनी सरकार पाडले, असा निशाणा उद्धव ठाकरेंना शिंदे-फडणवीस सरकारवर पाडला.

Uddhav Thackeray
Beed News: पावसाअभावी उभं पीक करपलं, वडिलांनी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं? नैराश्यातून तरुणाचं टोकाचं पाऊल

शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळाली नाही, पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीतर आंदोलन करणार. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. शेतकऱ्यांना मदत आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शक्य ते करू, असं आश्वासनही त्यांना यावेळी दिलं. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Devendra fadanvis Case: निवडणूक शपथपत्र प्रकरण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त

उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. शेतकरी पिकांचं नुकसान, दुबार पेरणी, पाण्याचा प्रश्न, कर्ज अशा सर्व समस्या उद्धव ठाकरे यांना सांगितल्या. तुम्ही फक्त धीर सोडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते आपण करू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com