प्रवाशांसाठी खूषखबर; सातारा- स्वारगेट शिवशाही बस सेवा सुरु

या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
प्रवाशांसाठी खूषखबर; सातारा- स्वारगेट शिवशाही बस सेवा सुरु
shivshai bus

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांचा संपामुळे दरराेज साताराहून पुण्याला जाणा-या नाेकरदारांना, विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत हाेता. परंतु आता साता-याहून पुण्याला जाणा-या थाेड्याफार प्रमाणात दिलासा मिळणार आहे. येथील मुख्य बसस्थानाकावरुन सातारा - स्वारगेट या शिवशाही बसची सुविधा प्रत्येक तासाला सुरु केल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराच्या प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली.

shivshai bus
हे व्हायला नकाे हाेतं! शरद पवार

रेश्मा गाडेकर म्हणाल्या सातारा येथून पुण्याला जाणा-यांची संख्या माेठी आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवशाही बस सुरु झालेली आहे. दरराेज सकाळी सहा वाजता फे-यांना प्रारंभ हाेता. या फे-या सांयकाळी पाच पर्यंत सुरु असतात. या बसचे शुल्क २३० रुपये आहेत. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे.

दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या संपामुळे साता-यातील बहुसंख्य प्रवाशांना खासगी सेवेचा आधार घ्यावा लागत हाेता. शिवशाही बस सुविधा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com