धक्कादायक! हनीट्रॅपमधून चक्क दिल्लीच्या डॉक्टरवरच मारला डल्ला (पहा व्हिडिओ)

तरुणीच्या नावाने फेक अकाउंट बनवून फसवणूक
धक्कादायक! हनीट्रॅपमधून चक्क दिल्लीच्या डॉक्टरवरच मारला डल्ला (पहा व्हिडिओ)
धक्कादायक! हनीट्रॅपमधून चक्क दिल्लीच्या डॉक्टरवरच मारला डल्ला (पहा व्हिडिओ)संजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - सोशल मीडियाच्या Social Media माध्यमातून अनोळखी तरुणीशी झालेल्या मैत्रीची मोठी किंमत एका सुशिक्षित डॉक्टरला Doctor मोजावी लागली आहे. यवतमाळच्या Yavatmal एका महाविद्यालयीन तरुणाने सोशल मीडियावर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून दिल्लीतील डॉक्टरशी मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करत त्याला तब्बल २ करोड रुपयांनी गंडा घातला आहे. संदेश मानकर असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाट्सऍप वर तरुणीच्या नावाने अकाउंट Fake Account तयार करून त्याद्वारे डॉक्टरशी संपर्क साधत मैत्री केली.

आपण श्रीमंत कुटुंबातील असून दुबई व परदेशात आपला व्यवसाय आणि हॉटेल्स असल्याचे सांगितले. दरम्यान आपल्या बहिणीचे अपहरण झाले असून अपहरणकर्त्याला दोन कोटी रुपये द्यायचे आहेत असे भ्रमणध्वनीवर सांगून पैश्यांची मागणी केली. त्याला बळी पडून डॉक्टरने दोन कोटी रुपये दिले. त्यानंतर डॉक्टरला बहिणीची सुटका झाली असे सांगून रक्कम घेतली.

त्यानंतर सोशल मीडियावरील सर्व अकाउंट आणि मोबाईल बंद झाल्याने व तरुणीशी कुठलाही संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री डॉक्टरला पटली त्यावरून त्यांनी यवतमाळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सायबर सेल ने या क्लिष्ट प्रकरणाचा शीघ्रगतीने तपास करून अवघ्या २४ तासात आरोपीला अटक करून त्याचेकडून रोख रक्कम, दागिने आणि मोबाईल असा एकूण एक कोटी ७८ लाख सहा हजार ९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

धक्कादायक! हनीट्रॅपमधून चक्क दिल्लीच्या डॉक्टरवरच मारला डल्ला (पहा व्हिडिओ)
Rain Update : बीडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी; मुख्य रस्ते जलमय

डॉक्टरला हनी ट्रॅप द्वारे फसविणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाच्या ह्या गुन्ह्यानंतर त्याने आणखी असे काही गुन्हे घडविले आहे का? आणि यात अन्य आरोपींचा समावेश आहे का याचा तपास पोलीस करीत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावधानता बाळगावी असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com