धक्कादायक! अकोल्यात मोरणा नदीची भिंत गेली चोरीला; गुन्हा दाखल!

भिंत चोरी गेल्या प्रकरणी पाटबंधारे विभागाने खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक! अकोल्यात मोरणा नदीची भिंत गेली चोरीला; गुन्हा दाखल!
मोरणा नदीजयेश गावंडे

अकोला : कोणी काय चोरेल याचा काही नेम नाही, असाच एक प्रकार अकोल्यात उघडकीस आलाय. अकोल्यातील मोरणा नदीचा (Morna River) पूर अकोला (Akola) शहरात शिरू नये, म्हणून मोरणा नदीच्या काठावर दगड मातीची भिंत उभारलेली आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावरील या भिंतीची माती चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भिंत चोरी गेल्या प्रकरणी पाटबंधारे विभागाने खदान पोलिस (police) ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मोरणा नदीला २० वर्षांपूर्वी पूर येत असल्याने पुराचे पाणी वस्त्यांमध्ये शिरत होते.

हे देखील पहा :

त्यासाठी पाटबंधारे विभागाने हिंगणा गणेश घाट ते खदानचा थांबा दरम्यान एक किलोमीटरपर्यंत दगडाचे पॅचिंग करत मातीची भिंत उभारली होती. त्यामुळे पुराचे पाणी वस्त्यामध्ये येत नव्हते. कापशी पाटबंधारे विभागाच्या आयुषी अग्रवाल या ३ नोव्हेंबर रोजी मोजणीदार यांच्यासह पूरसंरक्षक भिंतीची पाहणी करण्याकरिता गेल्या होत्या. या वेळी त्यांना हिंगणा गणेशघाट ते धोबी खदान पर्यंतच्या एक किमीपर्यंत माती खोदून नेली तरी कुणाला कसे दिसले नाही या नदीच्या काठावरच नागरी वस्ती आहे. मात्र एक किमी. पर्यंतची १०० फूट रूंद भिंत ट्रक लावून खोदून नेली असताना कुणाच्या कसे लक्षात आले नाही, हा संशोधनाचा विषय आहे.

मोरणा नदी
Breaking : गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला निघालेल्या टेम्पोला अपघात; दोन ठार!

संबंधित विभागालाही माहीत कसे झाले नाही, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पूर संरक्षक भिंतीतील व त्याला लागून असलेली माती व तसेच पॅचिंग दगड खोदकाम केल्याचे दिसून आले. जवळपास १०० फूट रुंद असलेली ही मातीची एक किमीपर्यंतच्या भिंतीची माती चोरून नेल्याचे दिसून आले. या भिंतीला २१ लाख रुपयांची माती लागली होती. ती खोदून नेल्याने सपाट झाला आहे. त्यामुळे महापूर आल्यास पाणी नागरी वस्तीमध्ये शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी खदान पोलिस आता गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com