धक्कादायक : क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करत विवाहितेचा खून!

शेजाऱ्यांच्या घरी का गेली? म्हणत विवाहितेस मारहाण करून खून; बीडच्या शेरी बुद्रुक येथील धक्कादायक घटना...
धक्कादायक : क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करत विवाहितेचा खून!
धक्कादायक : क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करत विवाहितेचा खून!SaamTVnews

बीड : कोणालाही न विचारता घरातून बाहेर का गेली म्हणून संतापलेल्या पती, दीर आणि सासऱ्याने विवाहितेला बेदम मारहाण करत खून (Murder) केलाय. ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) आष्टी (Ashti) तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे घडलीय.

याप्रकरणी आष्टी पोलिसात पती, सासरा आणि दिरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले वय 25 असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे.

हे देखील पाहा :

मयत मनीषाचं लग्न (Marriage) सात वर्षापूर्वी बाबासाहेब अशोक वाघुले याच्यासोबत झाले होते. मनीषा एक दिवस दुपारी शेजाऱ्यांच्या घरी गेली असता, घरात कोणाला विचारून बाहेर का गेली नाहीस ? म्हणत पती बाबासाहेब याने बेदम मारहाण केली.

धक्कादायक : क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करत विवाहितेचा खून!
"भाजप-राष्ट्रवादीची हातमिळवणी; याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर काय म्हणायचे?"

त्यानंतर बाबासाहेब, त्याचे वडील अशोक नारायण वाघुले आणि भाऊ प्रकाश या तिघांनी मनीषाला मारहाण करून तिचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून बाबासाहेब, अशोक आणि प्रकाश वाघुले या तिघांवर आष्टी पोलिसात (Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com