धक्कादायक! पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Amravati Police self-slaughter : अमरावती जिल्ह्यात आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे.
धक्कादायक! पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Amravati Latest News, Amravati crime newsSaam TV

अमरावती : अमरावती (Amravati) जिल्ह्यात एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गळफास (Police) घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळकृष्ण राठोड (वय 50) असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून राठोड यांनी पोलीस मुख्यालयाच्या (Police Headquarters) चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गेल्या 2 दिवसांत 2 पोलिसांनी अचानक आत्महत्या केल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. (Amravati Police Latest News)

Amravati Latest News, Amravati crime news
कॅनॉलमध्ये बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत; नवनीतपूर परिसरात हळहळ

मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण राठोड हे दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते. गुरूवारी (12 मे) सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यास हजर झाले होते. मात्र अचानक त्यांनी पोलीस पोलीस मुख्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. यामध्ये राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

राठोड यांनी आत्महत्या का केली याचे गुढ अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यांचा मृतदेह दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी दर्यापूर करीत आहे. दरम्यान, बुधवारी (11 मे) वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय किसनराव अडोकार (५४, रा. गगलानीनगर) यांनी आत्महत्या केली होती.

Amravati Latest News, Amravati crime news
धक्कादायक! गरिबीची भीषण दाहकता; महिलेने पोटच्या बाळाला २० हजारांना विकले

विजय यांचा मृतदेह आपल्या घरापासून काही अंतरावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. बदली करण्याची मागणी पूर्ण न करता निलंबनाची धमकी देत पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व वलगावचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी नाहक त्रास दिल्यामुळे विजय यांनी हा आत्मघाती निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. दरम्यान, विजय यांच्या नंतर आज राठोड यांनी देखील आत्महत्या केल्याने पोलीस खात्यात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.