धक्कादायक! सोयाबीनच्या पैशांच्या वादातून मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!

मुलाने दारूच्या नशेत सोयाबीन विक्रीच्या किरकोळ वादातून जन्मदात्या बापाच्या डोक्यावर वखराची लोखंडी पास मारून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे.
धक्कादायक! सोयाबीनच्या पैशांच्या वादातून मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!
धक्कादायक : सोयाबीनच्या पैशांच्या वादातून मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!SaamTvNews

संजय राठोड

यवतमाळ - पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली असून सख्ख्या मुलाने दारूच्या नशेत सोयाबीन विक्रीच्या किरकोळ वादातून जन्मदात्या बापाच्या डोक्यावर वखराची लोखंडी पास मारून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील अमृतनगर येथे रहिवासी असलेल्या अनिल मारोती गादेकर वय ३५ वर्षे हा, शेतातील सोयाबीन पिकाची विक्री करून घरी आला होता.

धक्कादायक : सोयाबीनच्या पैशांच्या वादातून मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून!
Amravati : 'कृषी कीर्तन'च्या माध्यमातून गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन जनजागृती!

घरी आल्यानंतर अनिलचा जन्मदाता बाप मारोती तुकाराम गादेकर वय ६२ वर्ष यांनी अनिलला "लोकांचे उधार घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत, तू आगाऊ खर्च करू नको" असे सांगितले. तसेच, सोयाबीन विक्री मधून मिळालेली रक्कम परत मागितली असता दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने जन्मदात्या बापाच्या डोक्यावर घरातील वखराच्या लोखंडी पास ने वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.