धक्कादायक! दोन शेजाऱ्यांचा एकमेकांच्या पत्नीवर बलात्कार; असा झाला उलगडा

Gujrat Crime : गुजरातमधील सूरतमधून एक बलात्काराचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे
धक्कादायक! दोन शेजाऱ्यांचा एकमेकांच्या पत्नीवर बलात्कार; असा झाला उलगडा
Gujrat CrimeSaam Tv

गांधीनगर : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच गुजरातमधील सूरतमधून (Surat) एक बलात्काराचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे दोन महिलांनी एकमेकांच्या पतींवर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी Gujrat Police) 3 जणांना अटकही केली आहे. ही धक्कादायक घटना सूरतच्या मंगरोळची असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणात एफआयआर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Gujrat Crime News)

Gujrat Crime
१०० तरुणींना जाळ्यात ओढले; 12 वी पास तरूण स्वतःच असा अडकला

मिळालेल्या माहितीनुसार, सूरत जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या दोन महिलांनी एकमेकांच्या पतींवर बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसरा दोषी या महिलेच्या पतीचा मित्र आहे. महिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ती घरात एकटी असताना आरोपी सुभाष (वय 34) तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर बलात्कार केला. सुभाष हा शेतमजूर आहेत.

सध्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे सुभाष याच्या पत्नीने आरोप केला आहे की, फिर्यादी महिलेच्या पती विनय (वय 33) याने तिच्यावर बलात्कार केला. विनय आणि त्याचा जबदस्तीने घरात घुसला आणि त्यांनी आळीपाळीने बलात्कार केला.

Gujrat Crime
असंख्य महिलांची फसवणूक! 94 मुलांचा बाप निघाला 'हा' डॉक्टर

असा झाला उलगडा

दरम्यान, सुभाष हा शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलवर अनेक कॉल केल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यादरम्यान महिलेने तिचा फोन घरी सोडला होता आणि त्यावेळी तिची बहीण तिथेच होती. मात्र विनयने पत्नीला सुभाषचे फोन तुझ्या मोबाईलवर वारंवार का येत आहेत, असे विचारले असता, सुभाष याने आपल्यावर वारंवार बलात्कार केला असून तो आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं विनयच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर विनय याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.