सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप

संपूर्ण घराचा कारभार माझ्याकडे दे म्हणत या रागातून सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप
सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेपकैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद : संपूर्ण घराचा कारभार माझ्याकडे दे म्हणत या रागातून सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी आरोपी Accused भारत उर्फ राजेश दिलीप पवार याला जिल्हा District व अतिरिक्त सत्र न्या.एम. आर.नेरलेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावत 15 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. २ वर्षापूर्वी तुळजापूर Tuljapur तालुक्यातील धोत्री Dhotri या ठिकाणी ही खुनाची घटना घडली होती. मृताची आणि आरोपीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध तामलवाडी पोलीस Tamalwadi Police ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

हे देखील पहा-

धोत्री शिवारातील शेतात Farm पवार कुटुंबीय वास्तव्याला होते. फिर्यादी महिलेचा पती काही वर्षापूर्वी मृत झाला होता. यामुळे त्यांच्या दोन मुलांकडे घराचा कारभार आला. यामध्ये आरोपी भारत ऊर्फ राजेश दिलीप पवार हा शेती पाहत होता, तर दुसरा मुलगा प्रशांत हा सोलापुरातील Solapur एका कारखान्यात नोकरी करत होता. घराचा मुख्य कारभार हा प्रशांतच पाहत होता. 5 सप्टेंबर 2019 या दिवशी सुटी असल्याने प्रशांत घराकडे आला होता.

सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप
दोन हजारांसाठी भावानेच केला भावाचा खून; आरोपी अटकेत

यावेळी आरोपी राजेशने प्रशांतला घरातील सर्व व्यवहार माझ्याकडे दे, नाही तर जिवे मारेन, अशी धमकी दिली होती. यात दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर याच रात्री राजेशने कुर्‍हाडीने प्रशांतच्या डोक्यात आणि तोंडावरती वार करत खून केला होता. हा सर्व प्रकार या दोघांच्या आई समोरच झाला असल्याने आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यालयाने आरोपीस जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.

Edited By- digambar jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com