प्रशासनाचा निर्बंध झुगारून मिरजेत व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने

प्रशासनाचा निर्बंध झुगारून मिरजेत व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने
miraj

सांगली : अनेक दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथील दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना जगावे का मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज (साेमवार) मिरजेत miraj "मी मिरजकर फौंडेशन " या संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा निर्बंध झुगारून मिरजेत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली आहेत. (shopkeepers-opened-shop-miraz-during-lockdown-sml80)

व्यापार बंद असल्याने प्रशासनाचे निर्बंध झुगारून कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडण्याचा आणि व्यापार सुरु करण्याचा निर्णय मिरज शहरातील बहुतांशी व्यापारी संघटनांनी घेतला होता.

मी मिरजकर फौंडेशन " या संघटनेने याप्रश्नी पुढाकार घेऊन शहरातील सर्व व्यापारी संघटनांना एकत्र येऊन दुकाने उघडणार असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज मिरजेतील दुकाने उघडण्यात आली. शहरातील काही व्यापाऱ्यांच्या मनात प्रशासन कारवाई करेल याची भीती होती. ती दुकाने मी मिरजकर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी स्वतः जाऊन उघडली. यावेळी महापालिका फिरते पथकाने उघडलेल्या दुकानाचे चित्रीकरण केले आहे.

miraj
सातारा : 29 बाधितांचा मृत्यू; महाबळेश्वरात एक रुग्ण आढळला

प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील संघर्ष अटळ असल्याचे चित्र दिसत आहे. आज उघडलेल्या दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली तर दुकानातील कामगार, व्यापारी कुटूंबासमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुधाकर खाडे यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com