Beed: आता लस घेतली तरच उघडता येणार दुकाने

आता शासकीय-निमशासकीय कार्यालयात "नो व्हॅक्सिन नो एंट्री"
Beed: आता लस घेतली तरच उघडता येणार दुकाने
Beed: आता लस घेतली तरच उघडता येणार दुकानेSaam Tv

बीड - जिल्ह्यात आता कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरच, दुकानदारांना आपली दुकाने उघडता येणार आहेत. त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात जर एंट्री करायची असेल, तर लस बंधनकारक असणार आहे. "नो व्हॅक्सिन नो एंट्री" असा आदेश बीडचे जिल्हाधिकारी, राधाविनोद शर्मा यांनी रात्री उशिरा काढले आहेत.

हे देखील पहा -

राज्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी, रात्री उशिरा जिल्ह्यात अनेक निर्बंध घातले आहेत. व्यवसायिकांबरोबरच त्यांच्या कर्मचार्‍यांना, लसीचा किमान एक डोस घेणे आवश्यक असून घेतला नसल्यास त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत.

Beed: आता लस घेतली तरच उघडता येणार दुकाने
कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीला अटक

शिवाय शासकीय- निमशासकीय कार्यालय, मंदिर यासह जवळपास सर्वच ठिकाणी, लस घेतली नसल्यास "नो व्हॉक्सिन नो इंट्री" असून प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, क्लासेससह इतर संस्थांमध्ये देखील लसीकरण केले नसल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रात्री उशिरा काढले आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर आता, बीड जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com