
सचिन कदम
Mumbai Crime News : गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसेच दिल्ली अशा शहरांमध्ये हनीट्रॅपच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशात आता अलिबागमधील एका तरुणाला हनीट्रॅपमध्ये ओढण्याचे जाळे आखलेल्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Mumbai News)
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढत, त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ काढून तरुणाला पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अलिबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील चर्चगेटमध्ये हे दोन भामटे असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती.त्यामुळे त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये सापळा रचून दोघांना अटक केली.
नेमकं काय घडलं?
धनश्री तावरे (मुंबई) आणि संजय सावंत (अलिबाग) अशी आरोपींची नावं आहेत. मुंबई येथून अलिबागला जागा बघण्याच्या हेतूने आलेल्या तरुणीने अलिबागमधील तरुणाला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढले. या घटनेत तक्रार दाखल केलेला व्यक्ती आरोपींना अलिबाग (Alibaug ) येथे घर दाखवत होता. आरोपी महिलेने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर शारीरिक संबधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी केली. मुंबई चर्चगेट येथे पैसे देण्यासाठी त्याला बोलावले. पैसे देण्यासाठी बोलवणाऱ्या तरुणीला रायगड पोलिसांनी सापळा रचत अटक केली. तसेच तीच्या साथीदाराला अलिबाग येथून पोलिसांनी अटक केली.
या आधी पुण्यात देखील अशीच एक घटना घडली होती. लॉजवर मुक्कामासाठी थांबणं एका तरुणाला महागात पडलं आहे. पुण्यात एका तरुणाला एका तरुणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून तब्बल ६७ लाख रुपयांची खंडणी (Extortion) उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने तरुणाला मैत्रीच्या जाळ्यात अडकवून तिच्या साथीदारांच्या मदतीने त्या तरुणाकडून तब्बल ६७ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. त्यानंतरही पैशांसाठी तरुणीकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या तरुणीच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.