रस्ता दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीनं श्राद्ध घालून आंदोलन
रस्ता दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीनं श्राद्ध घालून आंदोलनगजानन भोयर

रस्ता दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीनं श्राद्ध घालून आंदोलन

हा दुरुस्त करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

गजानन भोयर

वाशीम : वाशिम तालुक्यातील वाशिम वरून चिखली जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. हा दुरुस्त करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. Shraddha agitation on behalf of MNS for road repair

झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या नैतृत्वात जिल्हा महिला रुग्णालयाजवळ रोडचे श्राद्ध घालून आंदोलन केले.

या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरु करुन, त्वरित रोडचे पूर्ण केले नाही, तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितल आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com