Shradha Case : श्रद्धाच्या हत्येबाबत आणखी नवीन अपडेट समोर; ४ मित्रांनी नोंदवला पोलिासांकडे जवाब

पोलिसांनी शनिवारी श्रद्धाचे मित्र आणि सहकारी अशा ४ जणांचे जबाब नोंदवले आहे.
Shraddha Walker case
Shraddha Walker caseSaam tv

Shradha Walkar Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी वसईत तपास केला. पोलिसांनी शनिवारी श्रद्धाचे मित्र आणि सहकारी अशा ४ जणांचे जबाब नोंदवले आहे. श्रद्धाला २०२० मध्ये आफताबने केलेल्या मारहाणी संदर्भातही चौकशी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Shraddha Walker case
Shraddha Walker Case Evidence : आफताबचे कपडे, CCTV फुटेज अन् जंगलात तपास, पोलिसांच्या हाती मोठे पुरावे

वसईतील (Vasai) तरुणी श्रद्धा वालकर हिच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी वसईत दाखल झाले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांनी विविध ठिकाणी चौकशी करून तपास सुरू केला आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मित्र गॉडविन रॉड्रीक्स, राहुल रॉय, शिवानी म्हात्रे तसेच श्रद्धा मुंबईत ज्या कॉल सेंटरमध्ये काम करायची. तेथील व्यवस्थापक करण बहरी यांची चौकशी करून जबाब नोंदवला. तसेच आफताब याला अमली पदार्थांचे व्यसन असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

श्रद्धा आणि आफताब २०२० मध्ये वसईच्या रिगल अपार्टमेंट मध्ये भाड्याचा सदनिकेत रहात होते. या काळात आफताब दिला मारहाण करत होता. डिसेंबर महिन्यात त्याने श्रद्धाला बेदम मारहाण केली. श्रद्धाचा मित्र गॉडविन रॉड्रीक्स आणि राहुल रॉय याच्या मदतीने ती वसईच्या एव्हरशाईन येथील ओझॉन रुग्णालयात दाखल झाली होती. या मारहाणीत तिच्या चेहर्‍यावर, मानेवर आणि पाठीवर जखमा झाल्या होत्या.

Shraddha Walker case
Shraddha Walker case : श्रद्धा वालकर प्रकरणात नवा ट्विस्ट; आफताबने बदलले स्टेटमेंट; ३५ नाही तर...

२३ नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने तुळींज पोलीस ठाण्यात आफताबच्या विरोधात दिलेला अर्ज तुळींज पोलिसांनी सापडला आहे. तो दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. त्यात तिने आफताबने मारहाण केल्याचे सांगून तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. पण श्रद्धाने ही तक्रार आठ दिवसांनी परत घेतली असल्यामुळे तपासी अंमलदाराने दोघांचे जबाब नोंदवत तक्रार निकाली काढली होती.

आफताब तपासणीसाठी एम्स रूग्णालयात

आफताबला आज रात्री दिल्लीच्या एम्स रूग्णालयात तपासणी आणले होते. एम्स रूग्णालयात तपासणी केल्यानंतर आफताबला दुसरीकडे हलवण्याची शक्यता आहे. दुसऱ्या ठिकाणी हलवण्याअगोदर आफताबची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com