Pandharpur Wari 2023: पाऊले चालती पंढरीची वाट… श्रींच्या पालखीचे शुक्रवारी संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान

Gajanan Maharaj Palkhi: यंदा वारीचे हे ५४ वे वर्ष आहे.
Gajanan Maharaj Palkhi
Gajanan Maharaj PalkhiSaam Tv

Ashadhi Wari 2023: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी २६ मे रोजी संतनगरीतून पायदळ पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार ज्येष्ठ शुध्द सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाचे निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. (Latest Marathi News)

Gajanan Maharaj Palkhi
Nagpur-Pune Highway Accident: नागपूर-पुणे महामार्गावर एसटी आणि ट्रक भीषण अपघात; 3 जण जागीच ठार, 8 प्रवाशी जखमी

सकाळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी मंदिरात हजारो भाविक गर्दी करतात. सर्वप्रथम भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची पुजा करण्यात येते. त्यानंतर पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात भगव्या पताकाधारी वारकर्यासह एका गणवेषात,शिस्तीत टाळ मृदंगाचे निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान करणार आहे.

श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री शेत्र पंढरपूर (Pandharpur) पोहोचणार आहे या ठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच 27 जून ते दोन जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे. तीन जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे 23 जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी शेगाव (Shegaon) येथे पोहोचणार आहे

Gajanan Maharaj Palkhi
Pune News: हाैस जीवावर बेतली; भीमा नदीत बुडालेल्या २ मुलांचा मृतदेह सापडला

श्री संत गजानन महाराजांची पालखी २७ जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. याठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच २७ जून ते २ जुलै पर्यंत मुक्काम असणार आहे.१३ जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे आणि २३ जुलै रोजी खामगावला मुक्कामी असणार आहे. त्यानंतर २४ जुलै रोजी सोमवार रोजी श्रींची पालखी शेगावला पोहोचणार आहे. (Maharashtra News)

ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटरचे अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संत नगरीत दाखल होत असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com