प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी फुलांच्या सजावटीत रंगले श्री रेवणसिध्द मंदिर

आज देशभर वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. आपल्या देशाला लाभलेली लाखो नागरिकांची श्रद्धास्थान असलेली देवालय देखील देशाभिमाचे सण साजरे करण्याच्या बाबतीत मागे नसतात.
प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी फुलांच्या सजावटीत रंगले श्री रेवणसिध्द मंदिर
प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी फुलांच्या सजावटीत रंगले श्री रेवणसिध्द मंदिरSaam TV

विटा : आज देशभर वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. आणि आपल्या देशाला लाभलेली लाखो नागरिकांची श्रद्धास्थान असलेली देवालय देखील देशाभिमाचे आणि सण साजरे करण्याच्या बाबतीत मागे नसतात. आज पहाटेपासूनच पंढरपुर मधील श्री विठ्ठल मंदीरitthal Temple) असो वा आळंदीचे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

अशीच आणखी एका मंदिरामध्ये मनमोहक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. ते म्हणजे विट्याती रेणावी (Renavi) (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्धांच्या मंदीरामध्येही आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती मंदीरामध्ये फुलांच्या आकर्षक सजावटीत तिरंगा साकारला आहे आणि आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी फुलांच्या सजावटीत रंगले श्री रेवणसिध्द मंदिर
Padma Awards : डॉ.प्रभा अत्रेंना पद्मविभूषण; श्रीगुरु डॉ.बालाजी तांबेंना पद्मश्री जाहीर

रेणावीतील रेवणसिध्द मंदीर (Revansiddha Temple) हे पुरातण कालीन मंदीर असून अतिशय घडीव आणि जुनं बांधकाम या मंदीराला लाभलं आहे. इथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आज असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती श्री रेवणसिधद देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बालाजी गुरव, निलेश गुरव, जयराम गुरव, ओंकार गुरव, विठ्ठल नाना आणि संदीप गुरव यांच्या संकल्पनेतून आजची ही सजावट करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.