Nashik Graduate Constituency Election : थांबा, तुम्ही आत जाऊ नका ! शुभांगी पाटील यांना बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर अडवलं

थाेरात यांचा मला पाठींबा असल्याचा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला.
Shubhangi Patil
Shubhangi Patilsaam tv

- सचिन बनसाेडे

Nashik Graduate Constituency Election : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर तालुक्यात निवडणुक (election) प्रचारार्थ दौरा करताहेत. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शुभांगी पाटील यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केलं. शुभांगी पाटील (shubhangi patil) यांनी सय्यदबाबा दर्ग्यावर शाल अर्पण करत आपल्या दौ-याची सुरूवात केली.

Shubhangi Patil
Kokan News : शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; राष्ट्रवादीचा माजी आमदार परतणार स्वगृही ?

शुभांगी पाटील या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातील निवासस्थानी पोहचल्या. बाळासाहेब हे उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात आहेत. त्यामुळे पाटील यांना थाेरात यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशदारानजीक थांबवण्यात आले. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी परतीचा मार्ग धरला.

Shubhangi Patil
Mumbai News: गाेलमाल है भाई सब गाेलमाल है... फिल्म सिटी दाखविण्याचे बहाण्याने घडवली 'आरे' सफर, दाेघे अटकेत

माध्यमांशी बाेलताना पाटील म्हणाल्या थोरात यांच्याशी सकाळी फोनवर चर्चा झाली. ते हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे थोरात यांच्या निवासस्थानी कोणीही नव्हते. दरम्यान तरी देखील शुभांगी पाटील या थाेरातांच्या निवासस्थानी का गेल्या? त्यांची ही स्टंटबाजी हाेती की काय अशी शंका उपस्थित हाेत आहे. (Maharashtra Legislative Graduate Constituency Election Latest Updates)

Shubhangi Patil
Sangli News : ख्रिस्ती बांधवांचा शुक्रवारी सांगलीत महामाेर्चा; विविध संघटनांचा पाठिंबा

थोरात साहेब भाच्याला नाही तर भाचीला आशीर्वाद देतील : शुभांगी पाटील

नेते मंडळींना भेटून आशीर्वाद घेणं हे माझ कर्तव्य आहे. मी महाविकास आघाडीची (mva) उमेदवार असल्याने बाळासाहेब थोरात भाच्याला नाही तर भाचीला म्हणजेच मला आशीर्वाद देतील असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांचे मत घेऊनच मोठ्या नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असणार. त्यामुळे मी काँग्रेस (congress), राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहील असेही त्यांनी नमूद केले.

Shubhangi Patil
BJP Offered Satyajeet Tambe : काँग्रेसचा युवा नेता भाजपच्या गळाला ? अखेर सत्यजीत तांबे म्हणाले, आमचं ठरलं...

जे पक्षाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार? सत्यजित तांबेंवर निशाणा

सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांचा एबी फॉर्म कोरा होता. ते आता कुठ जातील हा त्यांचा विषय आहे. जे पक्षाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होतील अशा शब्दात शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या मी तळागाळातील असून मला भाजपचा कुठलाही फटका बसणार नाही. मी हाडाची शिक्षिका आहे. कपिल पाटील यांनी वेगळा विचार केला असेल. कदाचित कपिल पाटील यांना इथली माहिती नसावी असा टोलाही शुभांगी पाटील यांनी लागवला.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com