'हिरकणी' शुभांगी पवार यांचा मृत्यू; उदयनराजेंसह सातारा शाेकसागरात

'हिरकणी' शुभांगी पवार यांचा मृत्यू; उदयनराजेंसह सातारा शाेकसागरात
Shubhangi Pawar

सातारा : साडेतीन शक्ती पिठाच्या दर्शनाला गेलेल्या साताऱ्यातील शुभांगी पवार यांचा नांदेड येथे अपघाती मृत्यू झाला. त्या सातारा शहरात याेगाचे प्रशिक्षण द्यायच्या. तसेच त्यांना अध्यात्माची आणि सामाजिक कार्याची खूप आवड हाेती. आपल्या जगण्याला एक वेगळेपण असावे हा त्यांचा कायम मानस असायचा. बाईकवर स्वार होऊन निसर्गात भटकंती करणे त्यांना खूप आवडायचे. shubhangi-pawar-met-with-an-accident-in-nanded-hirkani-group-went-to-shakti-peeth-sml80

Shubhangi Pawar
चर्चाच चर्चा उदयनराजे-रामराजेंच्या भेटीची चर्चा

दाेन दिवसांपुर्वी साताऱ्यातील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या माध्यमातून बुलेटवरून नऊ महिला गेल्या देव दर्शनाला गेल्या हाेत्या. आज (मंगळवार) सकाळी नांदेड येथे ट्रकने दिलेल्या धडकेत साै. पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती समजताच सातारा शहरातील अनेक सामाजिक संस्थांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. साै. पवार यांच्या निधनाबद्दल खासदार उदयनराजे भाेसले यांनी समाजमाध्यमातून शाेक व्यक्त केला.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.