आमदार श्वेता महालेंसह ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

काेविड १९ च्या पार्श्वभुमीवर या आंदोलनास प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली होती.
आमदार श्वेता महालेंसह ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
shweta mahale

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील तसेच चिखली तालुक्यातील वीज महावितरण कंपनीने तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्यात यावे या मागणीसाठी चिखली येथील मुख्य महामार्ग पुणे नागपूरवर तब्बल चार तास रास्ता रोको भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले हाेते. या आंदाेलनात भाजप आमदार श्वेता महाले shweta mahale यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते सहभागी होते.

shweta mahale
अमरावतीत शांतता हवी! मग 'हे' करा; बाेंडेची आयुक्तांशी चर्चा

हे आंदाेलन दपडण्याचे काम पाेलिस प्रशासन करीत हाेते. परंतु त्यावेळी आमदार महाले आणि भाजप कार्यकर्त्यांनी शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी आंदाेलन छेडणारच असा निर्धार केला हाेता. तब्बल चार तास पुणे नागपूर महामार्ग राेखून धरला हाेता.

दरम्यान काेविड १९ च्या पार्श्वभुमीवर या आंदोलनास प्रशासनाने परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही रास्ता रोको आंदोलन केल्याने चिखली पाेलिसांनी आमदार महाले यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com