चंद्रपुरात महागाईविरुद्ध महिला काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

सतत वाढत चाललेले पेट्रोल-डिझेलचे दर, घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व वाढत्या महागाई विरोधात चंद्रपूर महिला काँग्रेसने 'स्वाक्षरी अभियान' यशस्वीपणे राबवले.
चंद्रपुरात महागाईविरुद्ध महिला काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
चंद्रपुरात महागाईविरुद्ध महिला काँग्रेसचे स्वाक्षरी अभियानसंजय तुमराम

चंद्रपूर : सतत वाढत चाललेले पेट्रोल-डिझेलचे दर, घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती व वाढत्या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेसने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत चंद्रपूर महिला काँग्रेसने पुढाकार घेत मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. Signature campaign of Congress against inflation in Chandrapur

हे देखील पहा -

12 ते 17 जुलै दरम्यान राज्यात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात स्वाक्षरी अभियान चालवण्यात येत असून या अभियानाचा आज शेवटचा दिवस आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने महागाईचे संकट अधिक गडद होत असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

चंद्रपुरात महागाईविरुद्ध महिला काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
दि.बा.पाटील यांच्या नावासाठी दिल्लीत होणार अनोखे आंदोलन

या संकटाची जाणीव करून देत चंद्रपूर महिला काँग्रेसने गेल्या पाच दिवसांपासून शहरात स्वाक्षरी अभियान चालवले आहे. या अभियानाला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. आज अभियानाचा शेवट वरोरा नाका चौकात करण्यात आला. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चौकात फिरून लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच होरपळून निघाले आहेत. त्यामुळे त्यांनीही या अभियानात सहभागी होत महागाईला विरोध दर्शवला.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com