Sikandar Shaikh: सिकंदर शेखने मैदान मारलं! पंजाब केसरीला आस्मान दाखवत उंचावली 'भीमा केसरी'ची गदा

हरियाणाच्या भुपेंद्र अजानाळा चितपटकरून सिकंदर भीमा केसरीचा मानकरी ठरला आहे.
Sikandra Shekh Latest News
Sikandra Shekh Latest NewsSaamtv

Pandharpur: पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाडल्यापासून सिकंदर शेख हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. उपांत्यफेरीत सिकंदर शेखचा महेंद्र गायकवाडने पराभव केला होता. यावेळी त्याला पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याचे बोलले जात होते.

पण सिकंदरनेही अवघ्या काही दिवसात मातीत उतरून मीच सिकंदर असल्याचे दाखवून दिले आहे. हरियाणाच्या भुपेंद्र अजानाळा चितपटकरून सिकंदर भीमा केसरीचा मानकरी ठरला आहे. (Sikandar Shaikh)

Sikandra Shekh Latest News
Amravati: धक्कादायक! अल्पवयीन कुमारी बनली माता, गुन्हा दाखल; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरमध्ये भरविलेल्या भीमा केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सिकंदर शेखने बाजी मारली. अटीतटीच्या लढतीमध्ये हरियाणाच्या भूपेंद्र अजनाळा या पैलवानाला‌ शेख याने अवघ्या पाच मिनाटामध्ये चितपट करून चांदीची गदा पटकावली.

खासदार धनंजय महाडीक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या भीमा साखर कारखान्यावर कुस्ती मैदान भरविण्यात आले होते.

Sikandra Shekh Latest News
Beed News : पालकांच्या अपेक्षा मुलांच्या जीवावर बेतत आहेत? बीडमधून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

दरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्र केशरी स्पर्धेतील सिकंदर शेख, महिंद्र गायकवाड यांनी हजेरी लावली होती होती. महिंद्र गायकवाड याने पंजाबच्या गोराला आस्मान दाखवत मैदान‌ मारले. कुस्ती स्पर्धेसाठी राज्य भरातून अनेक पैलवान आले होते. कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडीक यांच्या हस्ते पैलवानांना रोख बक्षीस देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन‌ शंकर पुजारी यांनी केले.

महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सिकंदरवर अन्याय झाल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. पण, आज सिकंदरने मैदानात उतरून खणखणीत उत्तर दिलं आहे. त्याच्या विजयामुळे कुस्तीप्रेमी सुखावले आहे. (Maharashtra Kesari)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com