Sillod Accident News: दुचाकी अपघातात बँक मॅनेजरचा मृत्यू; सिल्लोड-भराडी रस्त्यावरील घटना

हा भीषण अपघात घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड-भराडी रस्त्यावरील पाबळवाडी शिवारात झाला आहे.
Sillod Accident News
Sillod Accident NewsSaam Tv

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar Accident News: छत्रपती संभाजीनगरमधून एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. दुचाकीच्या अपघातात एका मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड-भराडी रस्त्यावरील पाबळवाडी शिवारात झाला आहे. (Latest Marathi News)

Sillod Accident News
Raj Thackeray On Missing Girls: मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढलं? राज ठाकरेंनी सांगितलं धक्कादायक कारण

नामदेव रायभान पवार असे मृताचे व्यक्तीचे नाव आहे. ते सिल्लोड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर दोन ट्रक एकमेकांना धडकल्याने मोठी आग लागली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार,अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात एक ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालक आणि सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.

Sillod Accident News
Beed News: विधवा महिलेला ब्लॅकमेल करत रिक्षाचालकासह 7 जणांचा अत्याचार; धक्कादायक घटनेने बीड हादरलं

अंत्यविधी उरकून येताना काळाचा घाला

अंत्यविधी उरकून घराकडे परतत असताना जमावामध्ये ट्रक घुसून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून जवळ असलेल्या टेंभुर्णी रोडवरील टाकळी पुनर्वसन गावानजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com