धुळ्यात मरणानंतरही मृताला भोगाव्या लागतायत मरण यातना...

स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहेत.
धुळ्यात मरणानंतरही मृताला भोगाव्या लागतायत मरण यातना...
धुळ्यात मरणानंतरही मृताला भोगाव्या लागतायत मरण यातना...भूषण अहिरे

धुळे: जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा आदिवासी अतिदुर्गम तालुका आहे. या तालुक्यातील ताजपूरी गावात अमरधाम हे गाव शिवारात नसून पूर्वापार आढे शिवारात गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. मात्र त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नाही. शेतातून प्रेतयात्रा घेऊन जातांना पिकांचे नुकसान होते, त्यामुळे शेतकरी शेतातून प्रेतयात्रा घेऊन जाण्यास मज्जाव करतात. त्यामुळे प्रत्येकवेळी नाल्यातून नातेवाईकांना मृतदेह घेऊन लागतो. या नाल्यात कायम स्वरूपी पाणी वाहत असल्याने प्रत्येक वेळी चिखलातून मार्गक्रम करीत नातेवाईकांना स्मशानभूमीत जावे लागत आहे.

हे देखील पहा -

नाल्यातून मृतदेह नेताना नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. मृददेहाला खांदे देणाऱ्यांना नाल्यातून आणि चिखलातून वाट काढत स्मशानभूमीत जावे लागते. एकतर आधीच आपल्या माणसाला गमावल्याचं दुःख त्यात मृतदेहाला व्यवस्थित स्मशानभूमीत नेण्याचं आव्हान अशा दुहेरी संकटात मृताचे नातेवाईक असतात. त्यामुळे माणसाची शेवटची यात्रा तरी सन्मामाने व्हावी यासाठी स्मशानभूमीपर्यंत रस्ता बांधणे अत्यावश्यक आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.