त्या तिघाना चपलेचा चोप; शाळकरी मुलींचा पाठलाग महागात

त्या तिघाना चपलेचा चोप; शाळकरी मुलींचा पाठलाग महागात
त्या तिघाना चपलेचा चोप; शाळकरी मुलींचा पाठलाग महागात

सिंधुदुर्ग : शाळकरी मुलींचा पाठलाग करून छेड काढल्याचा प्रकार घडली. या प्रकारात छेळ काढणाऱ्या तीन परप्रांतियांना नागरिकांनी पकड़ले. यानंतर त्या तिघंना मुलीच्या समोर आणत चपलेने चोप दिला. (Sindhdurg-news-girl-torcher-other-state-boy)

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले- खवणे येथील आकाश फिश मिल कंपनीतील दोन परप्रांतीय कामगारांनीं खवणे येथील शाळकरी मुलींचा पाठलाग करून छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. खवणे येथील शाळकरी मुली मंगळवारी दुपारी पाट हायस्कूल येथून घरी जात असताना हा प्रकार घडला. छेड काढल्याची माहीती गावातील नागरीकांना समजताच संतप्त लोकांनी फिश मिल कंपनी परिसरात येऊन मुलींच्या हस्ते छेड काढणाऱ्या त्या तीन परप्रांतीय कामगारांना चांगलाचं चोप दिला.

त्यांना कामावरुन केले कमी

सदर घटना निवती पोलीस ठाणेच्या हद्दीत घडली असून त्या परप्रांतीय कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले आहे. त्यामुळे मुलीच्या पालकांनी व येथील नागरीकिंनी हे प्रकरण आपापसात मिटवले आहे.

Related Stories

No stories found.