Burning Bus: सिंधुदुर्गात बर्निंग बसचा थरार, चालकाचं प्रसंगावधान, 37 प्रवासी थोडक्यात बचावले

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
Burning Bus: सिंधुदुर्गात बर्निंग बसचा थरार, चालकाचं प्रसंगावधान, 37 प्रवासी थोडक्यात बचावले
Burning BusSaam Tv

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग: पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे 4 वाजता एडगांव घाडीवाडीजवळ ही घटना घडली. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली. बसमधील 37 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे (Sindhudurg Burning Bus 37 Passengers Saved Due To Drivers Contextualization).

Burning Bus
Accident: खामगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात, उभ्या ट्रेलरवर ट्रक आदळला, दोन जण गंभीर जखमी

मनीष ट्रॅव्हल्सची ही बस (Bus) पहाटे पुण्याहून गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली असता बसने अचानक पेट (Burning Bus) घेतला. चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली. दरम्यान, बसमधील प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ उठू लागले आणि बसने मोठा पेट घेतला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Burning Bus
Bullock Cart Race: नांदगावात भाजप पदाधिकाऱ्याच्या वाढदिवशी ठेवलेल्या बैलगाडा शर्यतीत अपघात, तिघे जखमी

दरम्यान, महामार्ग विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन बंब (Fire Brigade) दाखल झाला आणि आग विझवण्यात आली. या घटनेनंतर एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता अडकलेली वाहने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com