Sindhudurg News: अरबी समुद्रात पाच मच्छिमारांसह नौका बेपत्ता; परिसरात खळबळ

मात्र काहीच हाती लागत नसल्याने त्यांनी आचरा पोलीस ठाण्यात खलाश्यांसह नौका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.
Sindhudurg News
Sindhudurg NewsSaam TV

Sindhudurg News: मच्छिमारांसंदर्भात एक दु:खद वृत्त समोर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भर समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक नौका बेपत्ता झाली आहे. नौकेवर असलेले दिवे सोमवारी मध्यरात्री शेवटचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर ही नौका गायब झाली. गेल्या २ दिवसांपासून या नौकेचा शोध घेणे सुरू आहे. या घटनेने परिसरातील मच्छीमार चिंतेत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अलसभा क्रमांक आयएनडी एमएच ०४ एमएम २९२१ ही नौका अरबी समुद्रात बेपत्ता झाली आहे. नौकेत ५ खलाशी होते. या नौकेचे मालक मुजफ्फर उर्फ चावल बशीर मुजावर हे आहेत.

Sindhudurg News
Mumbai : अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाचा अहवाल खोटा ?;पाहा व्हिडीओ

नौका समुद्रात (Sea) बेपत्ता झाल्यावर सुरूवातीला इतर मच्छीमारांनी (Fisherman)त्यांचा शोध घेतला. मात्र काहीच हाती लागत नसल्याने त्यांनी आचरा पोलीस ठाण्यात खलाश्यांसह नौका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

Sindhudurg News
PV Sindhu : मालदीवच्या नबाहावर सिंधूची मात; उपांत्यपूर्व फेरीत दाखल

अचरा बंदरमधील तळाशी ते देवबाग या पट्ट्यात हुक फिशिंगसाठी मच्छीमार गेले होते. अलसभा नौकाही त्याच दिशेला शेवटची दिसल्याचे दुसऱ्या नौकेतील खलाशांनी सांगितले आहे. कर्फुला मिन्झ, राजेश मिन्झ, प्रमोद किसान, पपन्ना गोशी, तांडेल करीअप्पा मर्नल हे पाच जण नौका घेऊन गेले होते. सदर घटनेत सिंधुदुर्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. घडलेल्या घटनेने इतर मच्छीमार मोठ्या दु:खात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com