त्‍या एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या नसून हत्या; आमदार नितेश राणे यांचा परिवहनमंत्रीवर निशाणा

त्‍या एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या नसून हत्या; आमदार नितेश राणे यांचा परिवहनमंत्रीवर निशाणा
nitesh rane
nitesh rane

सिंधुदूर्ग : राज्‍य परिवहन महामंडळातील ३६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली नाही; तर ती हत्या आहे. सरकारमुळे झालेल्या या हत्या आहेत. यामुळे संबधित मंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असे म्‍हणत आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्‍यावर जोरदार टीका केली. (Sindhudurg-news-st-employee-suicide-matter-MLA-Nitesh-Rane-targets-Transport-Minister-anil-parab)

nitesh rane
परिवहन मंत्री परब खाते सांभाळण्यात असमर्थ; विनायक मेटे यांचा आरोप

सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलणीकरण्यासाठी आंदोलन सुरू आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शवला आहे. त्याचवेळी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे परिवहन मंत्री अनिल परबांवर जोरदार टीका केली.

ते परिवार मंत्री आहेत

शंभर कोटींची वसुली करताना कोणती समिती जाहीर केली होती. सगळच्या सगळं खिशात टाकले. एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्यासाठी कोर्टाच्या निर्णयाची काय गरज आहे. हे परिवहन मंत्री नाहीत तर परिवार मंत्री आहे. जेवढी मेहनत शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला लावली; तेवढी एसटी कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना लावली असती तर आशीर्वाद मिळाले असते. परिवहन मंत्री तुम्ही जरा पोलिसांच्या गरड्यातून बाहेर गेलात तर तुम्ही परत घरी कस जाता आम्ही पण बघू. कसे आम्ही तुम्हाला टेकुळ देतो. हे सगळे तुमचे पाप असल्‍याचे आमदार राणे म्‍हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com