सिंधुदुर्गात पावसाचा जाेर सुरु; पावाचीवाडीचा संपर्क तुटला

सिंधुदुर्गात पावसाचा जाेर सुरु; पावाचीवाडीचा संपर्क तुटला
sindhudurg rain updates

सिंधुदुर्ग : गेल्या दाेन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने sindhudurg rain updates थैमान घातले आहे. सतत पडत असणा-या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण मधील सुख नदीने धोक्याची पाणी पातळी गाठली आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली आहे. रविवार पासून या भागात जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे आजही बाजारपेठेत पाणीच पाणी आहे. (sindhudurg-rain-updates-kankavali-kharepatan-marathi-news)

खारेपाटणच्या काही दुकानात पाणी शिरल्याने साहित्याचं देखील नुकसान झालं आहे. कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नांदगाव पावाचीवाडीचा संपर्क तुटला

नांदगाव पावाचीवाडी येथे डामरे येथून उगम पावलेल्या नदीला पूर आला आला आहे. नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने नांदगाव पावाचीवाडी येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी पावाचीवाडीचा संपर्क तुटला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे ब-याच ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने संपर्क तुटला आहे. नांदगाव पावाची वाडी येथे ही नदी पुलावरून वाहत असल्याने येथील संपर्क तुटला आहे.

sindhudurg rain updates
मी आज फार आनंदित झालाेय : नारायण राणे

भात शेतीचे नुकसान

दरम्यान साेमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कुडाळ मधील भंनसाळ नदीला पूर आला हाेता. संपूर्ण नदी पात्राचे पाणी भात लावणीमध्ये शिरले. त्यामुळे भात शेतीचे मोठं नुकसान झाले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com