सिंधूदूर्ग : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप; उद्या मतदान

मतदारांनी काेणाला काैल दिला हे १९ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीतूनच स्पष्ट होईल.
सिंधूदूर्ग : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप; उद्या मतदान
votingSaam Tv

सिंधुदुर्ग (sindhudurg) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत निर्णय दिल्यानंतर नगरपंचायतीच्या ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द झाली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमधील ओबीसी आरक्षित प्रत्येकी ४ जागा वगळता उर्वरित जागांसाठी निवडणूक होत आहे.

उद्या (मंगळवार) सर्व ठिकाणी १३ जागांसाठी निवडणूक (election) होत आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी ४० उमेदवार, वैभववाडी वाभवेसाठी ३७, कुडाळसाठी (kudal) ४१ तसेच कसई दोडामार्गसाठी ३६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. चारही नगर पंचायतीच्या निवडणुकीत एकूण २८ हजार ५७५ मतदार मतदान करणार आहेत.

voting
सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीचा काय मान ठेवलात? उदयनराजेंना सवाल

काँग्रेस (congress) या निवडणुकीत स्वबळावर लढत असल्याने खरी लढत ही भाजप (bjp) विरुद्ध शिवसेना (shivsena) राष्ट्रवादी (ncp) महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनविली आहे. मात्र, मतदारराजा (voter) कोणाच्या बाजूने कौल देणार याचा निकाल १९ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीतूनच स्पष्ट होईल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (mns) काही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर काही जागांवर बंडखोर अपक्षांचेही आव्हान राजकीय पक्षांना पेलावे लागणार आहे. असे असले तरी ही निवडणूक खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच रंगणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारही नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com