पाेलीसांवरील हल्ला प्रकरणात पाच महिला दाेषी; न्यायालयाने सुनावली सहा महिन्याची शिक्षा

सन 2019 कालावधीत घडली हाेती घटना.
Sangli Court
Sangli CourtSaam Tv

सांगली : कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस अधिकारी (Police) आणि कर्मचार्‍यांच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी पाच महिलांना (women) सहा महिन्यांची साधी कैदेची शिक्षा न्यायालयाने (court) नुकतीच सुनावली आहे. (sangli latest marathi news)

अकरा जानेवारी 2019 रोजी मिरज (miraj) तालुक्यातील मल्लेवाडी येथील पडलेल्या दरोड्याचा उकल करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी कोम्बिंग ऑपरेशनसाठी वड्डीच्या हद्दीत गेले होते. यावेळी काही महिलांनी बेकायदेशीर जमाव करून पोलिसांवर हल्ला केला हाेता. यामध्ये दाेन पाेलीस जखमी झाले हाेते. त्यानंतर संबंधित महिलांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला हाेता.

Sangli Court
सदाभाऊ खाेतांचा ताफा अडविला; सांगोल्यातील हाॅटेल मालकावर गुन्हा दाखल

किशोर कदम व विनोद कदम असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्याचा दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सरकारी वकील पक्षातर्फे मेघा प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास सपोनि बीबी तळपे यांनी केला. सांगली जिल्हा सत्र न्यायालय एस. बी. पोळ यांनी या प्रकरणात पाच महिलांना सहा महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये रेखा कलियुग भोसले, छायाका सुनील भोसले, जानकी गौडा भोसले ,मनीषा पाटील- भोसले, छोट्या उर्फ छाया ऋषिकेश पवार यांना यांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

Sangli Court
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्रा करणार देशाचे नेतृत्व; जाणून घ्या भारतीय संघ
Sangli Court
अजिंक्यतारा कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले; प्रशासनासह शेतकरीही खूष
Sangli Court
एमआयडीसीतील सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणी तिघे अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com