
Nashik Road Accident Latest Updates : शिर्डीला जाताना नाशिक जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात दहा भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये अंबरनाथ येथील मोरीवली गावातील सहा जणांचा समावेश आहे. या गावास अंबरनाथ (ambernath) येथील आमदार डॉ. बालाजी किणीकर (MLA Balaji Kinikar) यांनी तातडीने भेट दिली आहे. किणीकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच अपघातग्रस्तांना सरकार सर्वताेपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.
यावेळी अपघातातील (accident) मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार असल्याची माहिती आमदार किणीकर यांनी दिली. तसेच मंत्री दादा भुसे हे रुग्णालयात पोहोचले असून जखमींवर (injured) उपाचार सुरू आहेत. उपचारांकडे आमचं लक्ष असल्याची माहिती डॉ. बालाजी किणीकर यांनी ग्रामस्थांना दिली. (Maharashtra News)
अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी गुरुवारी रात्री १५ बस करून शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातानंतर राज्यभरातून शाेक व्यक्त हाेऊ लागला आहे. (Nashik Shirdi Highway Accident News)
मोरीवली गावाच्या इतिहासातील इतकी भीषण अपघाताची ही पहिलीच घटना आहे. एकाच वेळी गावातील तब्बल सहा जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.