ताड़गाव येथे घरघुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात 6 जण गंभीर जखमी

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील नीताराम पंधरे यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 6 व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
ताड़गाव येथे घरघुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात 6 जण गंभीर जखमी
ताड़गाव येथे घरघुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात 6 जण गंभीर जखमीSaam Tv News

गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील नीताराम पंधरे यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 6 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे नेण्यात आले होते, परंतु पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. six seriously injured in explosion of domestic gas cylinder at Tadgaon

हे देखील पहा -

स्वयंपाक करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये घरातील 5 लोक आणि शेजारील 1 व्यक्ती यांचा समावेश आहे. या सिलेंडरच्या स्फोटामुळे त्यांच्या घरातील सामानाचे अंदाजे 25 हजार रूपयांचे नुकसान झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com