पोहायला गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यु

गल्हाटी नदी पत्राच्या पाण्यात बुडून मृत्यु....
पोहायला गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यु
पोहायला गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्युSaam Tv

जालना - काल सायंकाळी खेळायला म्हणून बाहेर गेलेल्या सहा वर्षीय लहान मुलांचा पाण्यात बुडवून दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना अंबड तालुक्यातील पिठारी शिरस गावात घडली आहे. आदित्य बालाजी सगळे अस या सहा वर्षीय लहान मुलांचे नाव आहे. आदित्य काल सायंकाळी पाचच्या सुमारास खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेला होता. रात्री उशिरा पर्यंत मुलगा घरी न आल्याने त्याचे आई वडील आणि गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेतला.

हे देखील पहा -

मात्र, शर्तीचे प्रयन्त करून देखील रात्री उशीरा पर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याने,आज सकाळी गावातील नागरिकांनी त्यांचा गाव परिसरात शोध घेतला.आज सकाळी आकाराच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या गल्हाटी नदी पत्राच्या पाण्यात तरंगताना या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली आहे.

पोहायला गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यु
भारतीय जवानांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

मुलगा पोहण्यासाठी गेला असावा आणि नदीपात्रात जास्त पाणी असल्याने व आजूबाजूला कुणी नसल्याने पाण्यात बुडवून या मुलाचा मृत्यु झाला असावा असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दुर्दवी घटनेने गावसह परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.