नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

नांदेड जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजून ३३ मिनिटांनी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अर्धापूर तालुक्यात आणि नांदेड शहरातील तरोडा नाका, सांगवी अशा अनेक भागात जमीन हलल्याचे जाणवले
नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत
नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत- Santosh Joshi

नांदेड : जिल्ह्यात (Nanded) आज सकाळी आठ वाजून ३३ मिनिटांनी भुकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. अर्धापूर तालुक्यात आणि नांदेड शहरातील तरोडा नाका, सांगवी अशा अनेक भागात जमीन हलल्याचे जाणवले मात्र, कुठलही नुकसान झालं नाही मात्र, भुकंपाचा धक्का असल्याचे जाणवल्याने नागरिकांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Small earthquake in Nanded District today Morning

नांदेड चे जिल्हाधिकारी (District Collector) डॉ विपीन इटनकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भुकंपाचा केंद्र बिंदु असून त्याची तिव्रता 4.4 रिश्टरस्केल असल्याची माहिती दिली. या भुकंपाची तीव्रता आपल्याकडे फारशी नसली तरीही प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत
हिंगोली, वसमतमध्ये जमीन हादरली, भूकंपाची शक्यता

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत, औंढा, व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात रविवारी ता। अकरा सकाळी साडेआठ वाजता जमीन हादरली तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे याच वेळात एकापाठोपाठ एक असे दोन आवाज झाले यामुळे नागरिक भयभीत झाले. Small earthquake in Nanded District today Morning

हे देखिल पहा

वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे धक्के जाणवले. गुंज ,पांगरा शिंदे ,शिवपुरी टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा, इंजनगाव ,म्हातारगाव, महागाव, बोराळा, डोणवाडा, सुकळी, सेलू , अंबा, कौठा, खुदनापुर, किन्होळा सह वसमत शहरात धक्के जाणवल्याने नागरिक भयभित झाले.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com