भरदिवसा महिला बचत गटाचे 90 हजार रुपये लुटले; दोघांवर गुन्हा

भरदिवसा महिला बचत गटाचे 90 हजार रुपये लुटले; दोघांवर गुन्हा
Crime News

सोलापुर : सोलापुरातील बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील महिला बचत गटाला बॅंकेत मंजूर झालेल्या कर्जाची नव्वद हजार रुपये रक्कम बार्शी-सोलापूर रस्त्यावरील एचडीएफसी बँकेतून काढून महिला वाहनाकडे जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या हाताला हिसका देऊन रक्कम लंपास केली.

Crime News
तलाठ्यास लाच घेतल्याप्रकरणी वर्षाचा कारावास

याबाबत बार्शी शहर पोलिसांत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिराबाई केशव ठोंगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना एचडीएफसी बँकेजवळ शनिवारी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान घडली आहे.

दाेघांनी रक्कम लुटलेल्या बचत गटाचे नाव हे 'रेणुकादेवी बचत गट' असे आहे. हे बचत गट उपळाई येथील आहे. चोरट्यांनी पैशावर डल्ला मारल्याने बचत गटातील गरजू महिलांना आर्थिक मदत कशी करायची असा यक्ष प्रश्न महिलांसमोर उभा राहिला आहे.

editor : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com