तस्करांचा थरारक पाठलाग; पोलिसांनी जप्त केला 226 किलो गांजा!

कारचालक गांजा घेऊन कुठे जात होता, याचा तपास पाथरी पोलीस करत आहेत.
तस्करांचा थरारक पाठलाग; पोलिसांनी जप्त केला 226 किलो गांजा!
तस्करांचा थरारक पाठलाग; पोलिसांनी जप्त केला 226 किलो गांजा!राजेश काटकर

राजेश काटकर

परभणी : पाथरी Pathri पोलिसांनी एका कारवाईत 226 किलो गांजा पकडला आहे, गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई पाथरी-सेलू रोडवरील बोरग्वाहान येथे केली आहे. ग्रामस्थांच्या म्हण्यानुसार, एक भरधाव येणाऱ्या कारचा चेंबर फुटल्याने कार चालकाने कार रोडच्या कडेला लावून लपून बसला होता. ग्रामस्थांना कार आणि कार चालकांवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांनी ह्याची माहिती दिली.

हे देखील पहा-

बोरंगव्हानजवळ ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ती कार अडवली. यात तब्बल 11 लाख रुपये किंमतीचा 2 क्विंटल 26 किलो गांजा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एक जण फरार झाला आहे.

गणपतीच्या अनुषंगाने पोलिसांची पेट्रोलिंग सुरु होती. माहितीनुसार, पहाटे 3 वाजेच्या सुमारास परभणीकडून एक कार पाथरी कडे आली. त्यावेळेस कार चालकाने भरधाव वेगाने कार पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरातून सेलू रस्त्याकडे वळवली. अशी संशयास्पद बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी लागलीच कारचा पाठलाग सुरू केला. कार वेगाने पुढे जात बोरंगव्हानकडे गेली. येथे ग्रामस्थांना चोर आल्याचा संशय आला आणि त्यांनी कार अडवली.

तस्करांचा थरारक पाठलाग; पोलिसांनी जप्त केला 226 किलो गांजा!
Pune: ओझरचा विघ्नहर गणपती जन्मोत्सव फुलांच्या पाकळ्या उधळत साजरा

ग्रामस्थांच्या मदतीने गाडीतील एक महिला आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एक जण मात्र फरार झाला. मारोती रामराव बोलेगावे ( सिरसदेवी ता. गेवराई. जि. बीड ) आणि शिला संतोष राहाडे ( रुही ता. गेवराई जि. बीड ) असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गाडीची ( क्र एम एच 03 बी सी 5032 ) तपासणी केली आणि त्यात गांज्याने भरलेल्या गोण्या आढळून आल्या.

शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोलिसांनी पंचनामा केला. 7 लाख रुपये किंमतीची गाडी, 11 लाख 30 हजार 525 रुपयांचा म्हणजेच 2 क्विंटल 26 किलो 15 ग्राम गांजा आढळून आला.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com