Snake Viral Video : ऑफिसमध्ये शिरला साप आणि झालं असं काही...

एप्रिल महिन्यात ११ तारखेला देखील हाच साप या ऑफिसमध्ये आढळला होता.
Snake Viral Video : ऑफिसमध्ये शिरला साप आणि झालं असं काही...
Snake Viral Video : ऑफिसमध्ये शिरला साप आणि झालं असं काही...SaamTvNews

वसई/विरार : विरार शहरातील एका प्रॉपर्टी डिलरच्या खाजगी ऑफिसमध्ये अचानकपणे साप शिरल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ऑफिसमध्ये शिरलेला हा साप बिनविषारी धामण असून हाच साप मागील एप्रिल महिन्यातील ११ तारखेला देखील याच ऑफिसमध्ये आढळून आला होता. मात्र, तब्बल एक महिना उलटून देखील धामण साप त्याच कार्यालयात थाट मांडून बसला होता.

संबंधित ऑफिसमध्ये लोकांची ये-जा असते. परंतु, हा साप कोणालाही दिसला नाही. या ऑफिसमध्ये एक मीटिंग चालू असताना हा साप अचानकपणे येथे बसलेल्या एका व्यक्तीच्या पायाजवळून गेला. पायाला काहीतरी स्पर्श झाल्याचे लक्ष्यात येताच सदर व्यक्तीने खाली पाहिले असता त्यास हा साप दिसून आला व त्यांनतर संपूर्ण ऑफिसमध्ये पळापळ झाल्याचे आपल्याला CCTV फुटेजच्या माध्यमातून समजून येईल.

Snake Viral Video : ऑफिसमध्ये शिरला साप आणि झालं असं काही...
बायकोला आणायला मालकाची गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही!

साप ऑफिसमध्ये शिरत असल्याची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. याबद्दल सदर ऑफिसमधून सर्पमित्रांना माहिती देण्यात आली. या सापाला ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या कोणीही कोणतीही इजा होऊ दिली नाही. सर्पमित्रांनी या सापास पकडून विरार मधिल तुंगारेश्वर जंगलात सोडले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com