तब्बल बारा हजार सापांना जीवदान देणारा मावळातील एक अवलिया !

मावळ तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचरचे ज्येष्ठ सदस्य असलेले किरण मोकाशी हे सर्पमित्र असून सापांविषयी समाजात असलेले समज गैरसमज याबाबत ते जनजागृती देखील करत आहेत. मोकाशी यांनी आजपर्यंत सुमारे बारा हजार तीनशे विषारी व बिनविषारी सापांना जंगलात सोडून दिले आहेत.
तब्बल बारा हजार सापांना जीवदान देणारा मावळातील एक अवलिया !
तब्बल बारा हजार सापांना जीवदान देणारा मावळातील एक अवलिया !दिलीप कांबळे

मावळ : साप दिसला की भल्याभल्यांची भंबेरी उडते, अंगावर शहारे येतात, आपसूकच तोंडातून शब्द निघतो बापरे ! त्यातच खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी सापांना मारणारे देखील अनेकजण आहेत. मात्र, सापाला मारणे, दुखापत करणे किंवा त्याला नष्ट करणे योग्य नाही. अशा या सापांना जीवदान देणारे एक सर्पमित्र मावळात आहेत. किरण मोकाशी असे त्यांचे नाव असून त्यांनी आतापर्यंत तब्बल बारा हजार सापांना जीवदान दिले आहे.

मावळ तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचरचे ज्येष्ठ सदस्य असलेले किरण मोकाशी हे सर्पमित्र असून सापांविषयी समाजात असलेले समज गैरसमज याबाबत ते जनजागृती देखील करत आहेत. सापांसंदर्भात कोणाचाही फोन आला तरी सापाच्या सुरक्षिततेला ते प्राधान्य देतात. मोकाशी यांनी आजपर्यंत सुमारे बारा हजार तीनशे विषारी व बिनविषारी सापांना जंगलात सोडून दिले आहेत. सोबतच चार मोठे अजगर देखील पकडले आहेत. साप पकडण्यात त्यांचा हातखंडा आहे. साप पकडून त्यांना जंगलात सोडल्याची नोंद त्यांच्याकडे ठेवली आहे.

हे देखील पहा -

साप पकडण्याच्या स्टीकचा अथवा कोणत्याही साधनांचा वापर न करता ते विषारी सापही ते सहज पकडतात. आतापर्यंत नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापडा असे विषारी तर धूळनागीण, मांजऱ्या, हरणटोळ यासारखे बिनविषारी साप त्यांनी पकडले आहेत. धामण, दिवड, तस्कर, कवड्या यासारखे बिनविषारी सापांना त्यांनी वाचवले आहेत. सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत. सापाची हत्या होता कामा नये यासाठी सर्प संवर्धनासाठी जनजागृतीची गरज आहे असे मोकाशी सांगतात. सापंची हत्या होता कामा नये. लोकशिक्षण आणि विज्ञानाच्या माध्यमातून सर्पाविषयाचे गैरसमज दूर केले पाहिजेत. प्रबोधनातूनही शहरी व ग्रामीण भागात सापाला मारण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लोकशिक्षणाची अधिक गरज आहे.

तब्बल बारा हजार सापांना जीवदान देणारा मावळातील एक अवलिया !
कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडकोची विशेष गृहनिर्माण योजना

सापांविषयी अधिक माहिती सांगताना मोकाशी म्हणाले साप डूख धरतो. सापाला सुगंध आवडतो म्हणून तो केवड्याच्या बनात राहतो असे अनेक गैरसमज अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. सापांना संरक्षण देणारा वन्य जीवन संरक्षण कायदा 1972 पासून अस्तित्वात आला त्यानुसार साप पकडणे अथवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु या कायद्याची कितपत अंमलबजावणी होते हा संशोधनाचा विषय ठरेल शासनाने सापा पासून तयार होणाऱ्या वस्तू व निर्यात बंदी केली आहे. परंतु कायद्याने सर्व हत्या थांबणार नाही त्यासाठी लोकशिक्षणाचे आवश्यकता आहे. नागपंचमीच्या दिवशी सापाला देव माणून दूध पाजणारे नागरिक इतर दिवशी मात्र सापांना मारतात हे प्रकार थांबणे गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com