समाज माध्यमामुळे हजारो पती-पत्नी मध्ये दुरावा; तिसरी व्यक्ती सुखाच्या संसारातील अडथळा (पहा व्हिडिओ)

पति-पत्नीच्या भांडणाच्या 349 तक्रारी
समाज माध्यमामुळे हजारो पती-पत्नी मध्ये दुरावा; तिसरी व्यक्ती सुखाच्या संसारातील अडथळा (पहा व्हिडिओ)
समाज माध्यमामुळे हजारो पती-पत्नी मध्ये दुरावा; तिसरी व्यक्ती सुखाच्या संसारातील अडथळा (पहा व्हिडिओ)

संजय राठोड

यवतमाळ - पती-पत्नीच्या भांडणांची अनेक कारणे आहेत. यामध्ये निर्माण झालेल्या भांडण सोडविण्याची जबाबदारी महिला व बाल अत्याचार कक्षाकडून पार पाडली जाते. बदलती जीवनशैली भांडणाचे कारण ठरली आहे.अनेक प्रकरणांमध्ये मोबाईल हा भांडणाचा मुख्य केंद्रबिंदू राहीला आहे.या शिवाय विविध व्यसनामुळे पती-पत्नींचे भांडण होत असल्याचे पुढे आले आहे. महिला व बाल अत्याचार कक्षाकडे अशी प्रकरणे अनेक तक्रारी आल्यानंतर पती-पत्नी मध्ये तडजोड करण्याची महत्वाची भूमिका महिला व बाल अत्याचार समिती(भरोसा सेल) करण्याचा प्रयत्न करते. काही प्रकरणात समितीला यश येते तर काही प्रकरण थेट न्यायालयात जातात.

फेसबुक, व्हाॅट्सअप, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांमुळे अवघजग मुठीत समावल आहे. मात्र त्याचे चांगले आणि वाईट परिणाम ही समाजाच्या घटका मध्ये दिसून येत आहेत. तासन तास मरगड आलेल्या कोंबड्या सारखी मान खाली टाकून मोबाईल वर बोट फिरवल्यामुळे घराघरातील संवाद जणू इतिहास जमा झाल्या सारखा वाटत आहे.अशातच पती-पत्नी मध्ये एकमेकांकडे पाहण्याची संशयित वृत्ती अनेकांचे घर उद्ध्वस्त करत असल्याचे दिसत आहे. यातूनच पत्नीचा शारीरिक,आर्थिक,मानसिक छळ होत असल्याच्या अनेक तक्रारी आणि खटले न्यायालयात प्रलंबित आहे. महिला व बाल अत्याचार समितीकडे ३४९ तक्रारीत प्राप्त झाल्या आहेत.

समाज माध्यमामुळे हजारो पती-पत्नी मध्ये दुरावा; तिसरी व्यक्ती सुखाच्या संसारातील अडथळा (पहा व्हिडिओ)
वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेऊन भाजपने महाराष्ट्राचं नुकसान केलं - कॉंग्रेस

पती-पत्नीच्या भांडणांमध्ये मोबाईल हा नवा विषय अलीकडच्या काळात पुढे आला आहे. त्यावर जास्त वेळ बोलणे मेसेज करणे आणि इतर काही कारणामुळे संसाराची गाडी रुळावरून घसरली अनेक प्रकरणे महिला व बाल अत्याचार कशा कडे प्राप्त झाल्या आहे. ३१ पोलीस स्टेशनमध्ये महिलांचे गाऱ्हाणे जाणून घेता यावे यासाठी खास महिला कक्ष प्रत्येक ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी येणाऱ्या तक्रारी वर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. या तक्रारी सोडवण्यावर भर दिला जात असल्याचे महिला व बालकल्याण समिती कडून सांगण्यात आले आहे. पती-पत्नीच्या सुखाच्या संसाराला आग लावण्याचे काम अनेक वेळा कान भरणाऱ्या व्यक्तीमुळे होत असते. प्राप्त झालेल्या तक्रारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com