Solapur News: भीषण अपघात; ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

एसटी बसला अपघात झाल्यानंतर ती रस्त्यानजीकच्या शेतात जाऊन उलटली.
Solapur Accident
Solapur Accident Saam Tv

सोलापूर: अक्कलकोट- दुधनी रोडवर एसटी बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. एसटी बस (ST bus) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ही बस अक्कलकोट (Akkalkot) हून कल्लाप्पावाडीकडे जात होती आणि त्या दरम्यान एसटीचा अपघात झाला आहे. एसटी बस रस्त्यावरुन थेट शेजारील शेतात (Farm) जाऊन पलटली आहे.

हे देखील पाहा-

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बस उलटली आहे. या बसमध्ये एकूण ४५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. रस्ता खराब असल्याने एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे.

Solapur Accident
ATM मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, तुमच्या फायद्यासाठी RBI ने लागू केला हा नियम

स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अक्कलकोट येथे हलवण्यात आले असून 2 गंभीर जखमींना सोलापूर सिविल हॉस्पिटल कडे पाठवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com