बार्शी-आगळगाव रस्त्याची बकाल अवस्था; नागरिक हैराण

मागील १० ते १५ दिवसांपासून या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु असून ठेकेदाराने खड्डे बुजवण्याच्या कामात डांबर कमी वापरुन डांबरटपणा जास्त केल्याचे दिसून येत आहे.
Solapur Road Issue
Solapur Road Issueविश्वभुषण लिमये

सोलापूर - जिल्ह्यातील बार्शी - आगळगाव हा डांबरी रस्ता १० ते १५ वर्षापूर्वी करण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्यावरील फक्त खड्डे बुजवण्याचे काम केले जात आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून रस्ता दुरुस्त करण्यापलिकडे गेला आहे. रस्त्यावर (Road) डांबर न दिसता फक्त खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. मागील १० ते १५ दिवसांपासून या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु असून ठेकेदाराने खड्डे (potholes) बुजवण्याच्या कामात डांबर कमी वापरुन डांबरटपणा जास्त केल्याचे दिसून येत आहे. (Solapur Latest Update News)

हे देखील पहा -

खड्डे हवा मारून स्वच्छ करुन त्यामध्ये साईझ प्रमाणे खडी आणि डांबर वापरुन खड्डे बुजवणे गरजेचे होते परंतू ठेकेदाराने तसे न करता खड्यामध्ये फक्त खडी टाकून खड्डे बुजवल्याचा प्रकार बार्शी आगळगाव रोडवर दिसून येत असल्याची तक्रार आगळगाव येथील माजी सैनिक सुभाष गडगडे यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com