रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत २८ जणांविरोधात गुन्हा दाखल

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर (Facebook) आक्षेपार्ह प्रतिक्रिया करणाऱ्या २८ जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
Rupali Chakankar
Rupali Chakankar Saam Tv

सोलापूर : राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणे २८ जणांना महागात पडले आहे. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर (Facebook) आक्षेपार्ह प्रतिक्रिया करणाऱ्या २८ जणांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या २८ जणांच्या अडचणी वाढल्या आहेत. ( Solapur Crime News In Marathi )

Rupali Chakankar
Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

वटपौर्णिमेबाबत रुपाली चाकणकर यांनी भूमिका मांडली होती. 'आपण लग्न झाल्यापासून आतापर्यंत एकदाही वडाच्या झाडाला फेरे मारले नाहीत. नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही, असा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. त्या मजकूरावर युवराज ढगे याने आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती.

ढगेपाठोपाठ इतर जणांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या होत्या. या प्रतिक्रियांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांनी ढगे विरोधात पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विविध भागातील २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भांदवि कलम ५०९, ५००, ३५४ अ बाबी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ७७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Rupali Chakankar
Satara : 'महावितरण' चा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

चाकणकरांना मिळाली होती जीवे मारण्याची धमकी

राज्याचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali ChakanKar ) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. राष्ट्रीय महिला आयोगाकडे हा धमकीचा फोन (Threat Call ) आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाकडून चाकणकरांना माहिती कळविण्यात आली होती. ७२ तासांत जीवे मारू, असा धमकीचा फोन आला होता. अहमदनगरमधील एका माथेफिरूनं ही धमकी दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com