Solapur Crime News: धक्कादायक प्रकार..कौटुंबिक वाद विकोपाला, नवऱ्याने पत्नीचा कानच उपटून काढला

धक्कादायक प्रकार..कौटुंबिक वाद विकोपाला, नवऱ्याने पत्नीचा कानच उपटून काढला
Solapur News
Solapur NewsSaam tv

Solapur News: पती– पत्‍नीमध्‍ये सुरू असलेल्‍या कौटुंबिक वाद विकोपाला गेला. या वादातून पतीने थेट पत्‍नीचा (Solapur News) कानच उपटून काढल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला. सदर प्रकार अक्‍कलकोट (Akkalkot) तालुक्‍यातील उटगी या गावात घडला आहे. (Live Marathi News)

Solapur News
Latur News: बाळंतपणात समोर आला धक्‍कादायक प्रकार, पतीसह सासर, माहेरच्‍यांवर गुन्‍हा

अक्कलकोट तालुक्यातील उटगी गावात अंबजप्पा जमादार व पत्‍नी विजयालक्ष्‍मी जमादार हे वास्‍तव्‍यास आहे. पती– पत्‍नीमध्‍ये वाद सुरू होता. परंतु, हा वाद इतक्‍या विकोपाला गेला की रागाच्‍या भरात पतनीने पत्नीचा कान धरून ओढत (Crime) नेले. पती कान धरून ओढत असल्‍याने त्रास होवू लागल्‍याने आरोड्या मारत असलेल्‍या पतीला दया आली नाही. पती अंबजप्‍पा हा विजयालक्ष्‍मी यांचा कान धरून ओढतच राहिला. यामुळे कान फाटून बाजूला झाला.

Solapur News
Bribe Trap: तीन हजाराची लाच पडली महागात; एक्साइजच्या निरीक्षकासह तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जखमी पत्‍नी रुग्णालयात

नवऱ्याने रागाच्या भरात केलेल्या हल्ल्यात विजयालक्ष्मी जमादार यांचा कान तुटल्‍याने त्‍या गंभीर जखमी झाल्‍या. जखमी विजयालक्ष्मी हिला अक्कलकोट मधील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर पती अंबजप्पा जमादार याच्यावर अक्कलकोट पोलिसांनी गुन्‍हा दाखल करत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com