दहावीच्या निकालात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आले आहे.
दहावीच्या निकालात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल
दहावीच्या निकालात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वलSaam Tv

सोलापूर : दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर केले आहे. राज्याचा एकूण निकाल हा ९९ .९५ टक्के एवढा लागला आहे. दरम्यान, पुणे Pune विभागामध्ये सोलापूर जिल्हा अव्वल ठरलेला आहे. Solapur district Pune division 10th result

हे देखील पहा-

सोलापूर Solapur जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के एवढा लागला आहे. सोलापूर जिल्ह्यामधून एकूण ६५ हजार १९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज केले होते, त्यामध्ये ६५ हजार १९३ विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाला board पाठविण्यात आले आहे. यामध्ये ६५ हजार १७६ मुले उत्तीर्ण झालेली आहेत.

दहावीच्या निकालात पुणे विभागात सोलापूर जिल्हा अव्वल
 दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाचं काय? सगळा संभ्रमच...(पहा व्हिडिओ)

नववीचा अंतिम निकाल, हा दहावीचे वर्षभरामधील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन या आधारावर विषयनिहाय निकालाबद्दलचे गुणदान करण्यात आले आहे. यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. आज ऑनलाइन Online जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड Download करून, त्याची प्रिंट Print देखील काढता येणार आहे. Solapur district Pune division 10th result

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com