Solapur: आ. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मविआकडून महाराष्ट्र बंदला सुरुवात

आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Solapur: आ. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मविआकडून महाराष्ट्र बंदला सुरुवात
Solapur: आ. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मविआकडून महाराष्ट्र बंदला सुरुवातविश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरात Solapur जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे Praniti Shinde यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून Mahavikas Aghadi लखीमपूर खीर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येविरोधात Against Lakhimpur Kheri Violence बंदला पाठिंबा देण्यासाठी 'मूक धरणे आंदोलन' करण्यात येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे Congress, NCP, Shivsena Agitation कार्यकर्ते या मूक धरणे आंदोलनामध्ये सामील झाले आहेत. सकाळच्या सत्रात सोलापुरात बंदला Solapur Bandh म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र हळूहळू बंदला नागरिक प्रतिसाद देताना दिसतं आहेत. दरम्यान,कांही आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात ही घेतलं आहे.

सकाळी 9 ते 12 दरम्यान बाजारसमिती बंदला सोलापूरकरांकडून अल्प प्रतिसाद;

Solapur: आ. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मविआकडून महाराष्ट्र बंदला सुरुवात
Solapur: आ. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मविआकडून महाराष्ट्र बंदला सुरुवातविश्वभूषण लिमये

सोलापुरातील बाजार समितीमध्ये सकाळी 9 ते 12 मार्केट बंद ठेवावे असे आवाहन सोलापुरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले होते. मात्र बाजार समितीमधले केवळ व्यवहार बंद ठेवले असून, गर्दी मात्र तशीच आहे.

Solapur: आ. प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मविआकडून महाराष्ट्र बंदला सुरुवात
नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; बाजार राहणार सुरु

उत्स्फूर्त बंद असा बाजार समितीमध्ये दिसून येत नाही. सोलापुरातल्या बाजार समितीमध्ये या बंदला अतिशय अल्प असा प्रतिसाद दिसतोय. त्यामुळे म्हविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी एपीएमसी मार्केट मध्ये उतरून आवाहन केल्यानंतर व्यापारी, शेतकरी अल्प प्रमाणात बंदला पाठिंबा देताना पहायला मिळतायत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com