आम्ही मांजरप्रेमी! हरवलेल्या बोक्याला शोधण्यासाठी शहरात लावले पोस्टर; ३ दिवसांनी लागला 'मन्या'चा शोध

Solapur Missing Cat Found: भिंतीवर पोस्टर चिकटवण्यापासून सोशल मीडियावर आवाहन केल्याच्या तीन दिवसांनंतर मांजराचा शोध लागला.
Solapur Missing Cat Found
Solapur Missing Cat Foundविश्वभूषण लिमये

सोलापूर: एखादा प्राणी हा नुसता प्राणी न राहता कुटुंबातील सदस्य बनून जातो. बासूतकर कुटुंबीयांच्या घरातील 'मन्या' नावाचं एक मांजर, बोका (Cat) म्हणजे कुटुंबातील सदस्य तीन दिवसांपासून गायब होते. भिंतीवर पोस्टर चिकटवण्यापासून सोशल मीडियावर आवाहन केल्याच्या तीन दिवसांनंतर मांजराचा शोध लागला. त्यानंतर बासूतकर कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. (Solapur Missing Cat News)

Solapur Missing Cat Found
PDF File Unlock : पीडीएफ फाईलचा पासवर्ड विसरलात? 'ही' ट्रिक वापरुन करा अनलॉक

बासूतकर कुटुंबीयांच्या घरातील मांजर म्हणजेच मन्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मन्याच्या पोटावर जखम झाली होती. त्याच्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्याचा शोध घेण्यात आला. फोनाफोनी करुन पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. बबनराव कांबळे यांच्या क्लिनिकविषयी त्यांना माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता रात्री दीड वाजेच्या सुमारास मन्याला घेऊन ते रुग्णालयात दाखल झाले.

डॉ. कांबळे यांनी विलंब न करता मन्यावर उपचार सुरू केले. कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे मन्याच्या पोटाला मोठी जखम झाली होती. जखमेला टाके घेण्याशिवाय पर्याय नव्हता. डॉ. कांबळे यांनी टाके घेण्यापूर्वी, मन्याला भुलीचे इंजेक्शन टोचले, तेव्हा निपचित पडलेला मन्या ताडकन उठला आणि पुढच्याक्षणी नखे ओरबाडत मन्या दवाखान्यातून पळून गेला. त्यामुळे बासूतकर कुटुंबीयांना अधिकच काळजी वाटू लागली.

Solapur Missing Cat Found
Ameesha Patel: ४६ वर्षांच्या अमिषा पटेलला पाणी पिताना पाहून चाहत्यांचाही घसा पडला कोरडा; कमेंट्समधून दिलं भरभरुन प्रेम, पाहा Photos

मन्या हरवल्याच्या (Missing) रात्रीपासून मन्याच्या शोधमोहिमेस सुरुवात झाली. तीन दिवस शोधूनही मन्याचा शोध लागला नाही. त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. मन्या हरवलेल्या भागात पॉम्प्लेट वाटून सर्वांकडे विचारणा केली.

अखेर चौथ्या दिवशी कृष्णा कॉलनी सोसायटीत मन्या सापडला आणि बासूतकर कुटुंबियांच्या जिवात जीव आला. एका मांजरप्रेमी कुटुंबाकडून आपल्या पाळीव मांजराची शोधमोहीम यशस्वी झाली आणि त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या घटनेमुळे मन्या नावाचा बोका सोलापूरात चांगलाच प्रसिद्ध झाला हे मात्र नक्की.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com