Onion: ११०० गाड्या कांद्याची आवक; एक दिवस बाजार समिती राहणार बंद

११०० गाड्या कांद्याची आवक; एक दिवस बाजार समिती राहणार बंद
Onion: ११०० गाड्या कांद्याची आवक; एक दिवस बाजार समिती राहणार बंद
Onionsaam tv

सोलापूर : गेल्‍या काही दिवसांपासून कांद्याची आवक मोठ्यात प्रमाणात वाढली आहे. यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तब्‍बल ११०० गाड्या कांद्याची बंपर आवक झाली आहे. कांद्याची आवक अधिक होत असल्‍याने बाजार समितीने (Market Committee) उद्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (solapur news 1100 carts of onion arrives One day the market committee will be closed)

Onion
Crime: अगोदर सीसीटीव्‍हीची दिशा बदविली मग फोडले एटीएम

सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या (Solapur Market Committee) इतिहासामध्ये मागच्या काही दिवसांपासून विक्रमी कांद्याची आवक होत आहे. सोलापूर (Solapur) बाजार समितीत शेजारील राज्‍यांमधून देखील कांदा येत असतो. दोन दिवसांपूर्वीच ९०० गाड्या कांद्याची आवक बाजार समितीमध्ये झाली होती. तर आज ११०० गाड्या कांद्याची (Onion) विक्रमी आवक झाली आहे. याकारणाने शुक्रवारी एक दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असणार आहे.

कांद्याचे भाव मात्र स्थिर

बाजार समितीमध्ये जिकडे पाहावं तिकडे कांदाच कांदा दिसून येत आहे. असे असले तरी कांद्याचे भाव अद्याप स्थिर आहेत. सध्या एक नंबर कांद्याला २३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी आनंदी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com