शेतकऱ्याचे लोकप्रतिनिधींच्‍या वीजबिलासाठी भिकमागो आंदोलन

शेतकऱ्याचे लोकप्रतिनिधींच्‍या वीजबिलासाठी भिकमागो आंदोलन
शेतकऱ्याचे लोकप्रतिनिधींच्‍या वीजबिलासाठी भिकमागो आंदोलन
Solapur NewsSaam tv

सोलापूर : महावितरणकडे राज्यातील लोकप्रतिनिधींची वीजबिल थकीत आहेत. हे वीजबिल भरून लोकप्रतिनिधींना चिंतामुक्त करण्यासाठी सोलापुरातील एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने (farmer) राज्यातील लोकप्रतिनिधींचे वीजबिल भरण्यासाठी आजपासून भिकमागो आंदोलनाला सुरुवात केली आहे. (solapur news Begging movement of farmers people representatives for electricity bill)

सोलापुरातील (Solapur) रुपाभवानी मातेच दर्शन घेऊन अनिल पाटील या शेतकऱ्याने भीक मागायला सुरुवात केली आहे. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस ते भीक मागणार असून मिळालेली रक्कम संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे ते जमा करणार आहेत. फोन पे आणि गुगल पेच्या माध्यमातून ते बिलासाठी भीक स्वीकारणार आहेत. गळ्यामध्ये एक खपाटाचा डब्बा अडकवून ते भीक मागात आहेत. त्यामुळे अनिल पाटील या शेतकऱ्याने सुरु केलेल्या या अतरंगी आंदोलनाची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.