Shahajibapu Patil News: शहाजीबापूंविरोधात मतदारसंघातील 45 गावांत नाराजीचा सूर, विरोधासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

शहाजीबापूंच्या मतदारसंघात नेमकं चाललंय काय?
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSaam Tv

सोलापूर - अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकास निधींचे वाटप करताना आमदारांनी शिफारस केलेल्या गावांनाच निधी मिळतो. निधी वाटपात आमदार शहाजीबापूंसह इतर आमदारांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील ४५ सरपंचांनी केला आहे.

Shahajibapu Patil
Navi Mumbai News : चर्चा तर होणारच! नवी मुंबईत रंगला श्वानांचा अनोखा विवाह सोहळा

शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील (Sangola) ४५ सरपंच हे जिल्हा परिषदेत आले होते. त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांची भेट घेत आपली विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला. संदीप कोहिनकर यांनी सरपंचांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांच्या मागणीसंबंधी समाजकल्याण अधिकारी सुनील खामितकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.

विकास कामांसाठी स्थळ निश्चित करण्याचे अधिकार विषय समिती, स्थायी समिती आणि जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेस आहेत.सध्या प्रशासक नियुक्त असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे काही गैर नाही.

Shahajibapu Patil
Rohit Sharma: आधी भविष्यवाणी, मग शतक... तीन दिवसांपूर्वी केलेल्या रोहितच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा

ग्रामपंचायतीने अनुसुचित जाती वस्तीमधील विकास कामासंदर्भात केलेला ठराव ग्राह्य का धरला जात नाही, असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. सरपंचांची यादी ग्राह्य धरावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. याची दखल घेतली नाही तर आमदार शहाजी पाटलांविरोधात रस्त्यावर उतरण्यामचा इशारा या 45 सरपंचांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com